संतवाणी
लोकप्रिय अभंग - गीतांचा संग्रह
१)ॐनमोजी आद्या
ॐ नमोजी आद्या ᛁ वेद प्रतिपाद्या ᛁᛁजय जय स्वसंवेद्या ᛁ आत्मरुपा ᛁᛁ१ᛁᛁदेवा तूंचि गणेशु ᛁ सकलमति प्रकाशु ᛁᛁम्हणे निवृत्ती दासु ᛁ अवधारिजो जी ᛁᛁ२ᛁᛁअकार चरण युगुल ᛁ उकार उदार विशाल ᛁᛁमकार महामंडल ᛁ मस्तकाकारें ᛁᛁ३ᛁᛁहे तिन्ही एकवटले ᛁ तेथें शब्दब्रह्म कवळलेᛁᛁते मिया श्रीगुरुकृपा नमिलें ᛁ आदिबीज ᛁᛁ४ᛁᛁआता अभिनव वाग्विलासिनी ᛁ जे चातुर्यार्थ कलाकामिनी ᛁᛁते श्री शारदा विश्वमोहिनी ᛁ नमिली मियां ᛁᛁ५ᛁᛁ
ॐ नमोजी आद्या ᛁ वेद प्रतिपाद्या ᛁᛁ
जय जय स्वसंवेद्या ᛁ आत्मरुपा ᛁᛁ१ᛁᛁ
देवा तूंचि गणेशु ᛁ सकलमति प्रकाशु ᛁᛁ
म्हणे निवृत्ती दासु ᛁ अवधारिजो जी ᛁᛁ२ᛁᛁ
अकार चरण युगुल ᛁ उकार उदार विशाल ᛁᛁ
मकार महामंडल ᛁ मस्तकाकारें ᛁᛁ३ᛁᛁ
हे तिन्ही एकवटले ᛁ तेथें शब्दब्रह्म कवळलेᛁᛁ
ते मिया श्रीगुरुकृपा नमिलें ᛁ आदिबीज ᛁᛁ४ᛁᛁ
आता अभिनव वाग्विलासिनी ᛁ जे चातुर्यार्थ कलाकामिनी ᛁᛁ
ते श्री शारदा विश्वमोहिनी ᛁ नमिली मियां ᛁᛁ५ᛁᛁ
२) रुप पाहता लोचनीं
रूप पाहतां लोचनीं ᛁ सुख झालें वो साजणी ᛁतो हा विठ्ठल बरावा ᛁ तो हा माधव बरवा ᛁबहुत सुकृतची जोडी ᛁ म्हणुनी विठ्ठलीं आवडी ᛁसर्वं सुखाचे आगर ᛁ बाप रखुमादेवीवर ᛁ
२) रुप पाहता लोचनीं
रूप पाहतां लोचनीं ᛁ सुख झालें वो साजणी ᛁ
तो हा विठ्ठल बरावा ᛁ तो हा माधव बरवा ᛁ
बहुत सुकृतची जोडी ᛁ म्हणुनी विठ्ठलीं आवडी ᛁ
सर्वं सुखाचे आगर ᛁ बाप रखुमादेवीवर ᛁ
३) सुंदर तें ध्यान उभें विटेवरी
सुंदर तें ध्यान उभें विटेवरी ᛁ कर कटावरी ठेवूनियां ᛁᛁ १ᛁᛁ
तुळसीहार गळां कांसे पितांबर ᛁ आवडे निरंतर हेंचि ध्यान ᛁᛁ२ᛁᛁ
मकरकुंडलें तळपती श्रवणी ᛁ कंठी कौस्तुभमणि विराजित ᛁᛁ३ᛁᛁ
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ᛁ पाहीन श्रीमुख आवडीनें ᛁᛁ४ᛁᛁ
तुळसीहार गळां कांसे पितांबर ᛁ आवडे निरंतर हेंचि ध्यान ᛁᛁ२ᛁᛁ
मकरकुंडलें तळपती श्रवणी ᛁ कंठी कौस्तुभमणि विराजित ᛁᛁ३ᛁᛁ
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख ᛁ पाहीन श्रीमुख आवडीनें ᛁᛁ४ᛁᛁ
४) आवडे हें रुप गोजिरें सगुण
आवडे हें रूप गोजिरें सगुण ᛁ पाहतां लोचन सुखावले ᛁᛁ१ᛁᛁआतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे ᛁ जो मी तुज पाहे वेळोवेळां ᛁᛁ२ᛁᛁलांचावले मन लागलीसे गोडी ᛁ तें जीवें न सोडी ऐसें झालें ᛁᛁ३ᛁᛁतुका म्हणे आम्ही मागावें लडिवाळी ᛁ पुरवावी आळी मायबापा ᛁᛁ४ᛁᛁ
५) येग येग विठाबाई
येग येग विठाबाई ᛁ माझे पंढरीचे आई ᛁᛁ१ᛁᛁभीमा आणि चंद्रभागा ᛁ तुझ्या चरणीच्या गंगा ᛁᛁ२ᛁᛁइतुक्यासहित त्वां बा यांवे ᛁ माझे रंगणी नाचावें ᛁᛁ३ᛁᛁमाझा रंग तुझे गुणीं ᛁ म्हणे नामयाची जनी ᛁᛁ४ᛁᛁ
६)सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ᛁब्रह्म सनातन विठ्ठल हा ᛁᛁ१ᛁᛁपतित पावन मानस मोहन ᛁ ब्रह्म सनातन विठ्ठल हा ᛁᛁ२ᛁᛁध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन ᛁ ब्रह्म सनातन विठ्ठल हा ᛁᛁ३ᛁᛁज्ञानदेव म्हणे आनंद चिद्धन ᛁ ब्रह्म सनातन विठ्ठल हा ᛁᛁ४ᛁᛁ
७) योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजणी
योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजणी ᛁपाहतां पाहतां मना न पुरेचि धनी ᛁᛁ१ᛁᛁदेखिला देखिला गे माये देवांचा देवो ᛁफिटला संदेहो निमालें दुजेपण ᛁᛁ२ᛁᛁअनंत रूपे अनंत वेषें देखिलें म्यां त्यासी ᛁबाप रखुमादेवीवरू खूण बाणली कैसी ᛁᛁ३ᛁᛁ
८) देवाचिये द्वारी उभा क्षणभरी
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ᛁ तेणे मुक्ति चारी साधियेल्या ᛁᛁहरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ᛁ पुण्याची गणना कोण करी ᛁᛁअसोनी संसारी जिव्हे वेगु करी ᛁ वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ᛁᛁज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ᛁ द्वारकेचा राणा पंडावाघरीं ᛁᛁ
९) कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता ᛁ बहीण बंधू चुलता कृष्ण माझा ᛁᛁ१ᛁᛁकृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारू ᛁ उतरी पैल पारू भवनदी ᛁᛁ२ᛁᛁकृष्ण माझे मन कृष्ण माझे जन ᛁ सोईरा सज्जन कृष्ण माझा ᛁᛁ३ᛁᛁतुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा ᛁ वाटे न करता परता जीवा ᛁᛁ४ᛁᛁ
१०) ज्ञानियांचा राजा गुरु महाराव
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ᛁ म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसे ᛁᛁ१ᛁᛁमज पामरा हें काय थोरपण ᛁ पायींची वहाण पायी बरी ᛁᛁ२ᛁᛁब्रह्मादिक जेथें तुम्हा वोळगणे ᛁ इतर तुळणे काय पुढे ᛁᛁ३ᛁᛁतुका म्हणे नेणों युक्तीचिया खोली ᛁ म्हणोनी ठेविली पायीं डोई ᛁᛁ४ᛁᛁ
११) पंढरीचा वास चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान ᛁ आणिक दर्शन विठोबाचे ᛁᛁ१ᛁᛁहेंचि घडो मज जन्मजन्मांतरी ᛁ मागणे श्रीहरी नाही दुजे ᛁᛁ२ᛁᛁमुखी नाम सदा संतांचे दर्शन ᛁ जनीं जनार्दन ऐसा भाव ᛁᛁ३ᛁᛁनामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी ᛁ कीर्तन गजरीं सप्रेमाचे ᛁᛁ४ᛁᛁ
आवडे हें रूप गोजिरें सगुण ᛁ पाहतां लोचन सुखावले ᛁᛁ१ᛁᛁ
आतां दृष्टीपुढें ऐसाचि तूं राहे ᛁ जो मी तुज पाहे वेळोवेळां ᛁᛁ२ᛁᛁ
लांचावले मन लागलीसे गोडी ᛁ तें जीवें न सोडी ऐसें झालें ᛁᛁ३ᛁᛁ
तुका म्हणे आम्ही मागावें लडिवाळी ᛁ पुरवावी आळी मायबापा ᛁᛁ४ᛁᛁ
५) येग येग विठाबाई
येग येग विठाबाई ᛁ माझे पंढरीचे आई ᛁᛁ१ᛁᛁ
भीमा आणि चंद्रभागा ᛁ तुझ्या चरणीच्या गंगा ᛁᛁ२ᛁᛁ
इतुक्यासहित त्वां बा यांवे ᛁ माझे रंगणी नाचावें ᛁᛁ३ᛁᛁ
माझा रंग तुझे गुणीं ᛁ म्हणे नामयाची जनी ᛁᛁ४ᛁᛁ
६)सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण
सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ᛁब्रह्म सनातन विठ्ठल हा ᛁᛁ१ᛁᛁ
पतित पावन मानस मोहन ᛁ ब्रह्म सनातन विठ्ठल हा ᛁᛁ२ᛁᛁ
ध्येय ध्याता ध्यान चित्त निरंजन ᛁ ब्रह्म सनातन विठ्ठल हा ᛁᛁ३ᛁᛁ
ज्ञानदेव म्हणे आनंद चिद्धन ᛁ ब्रह्म सनातन विठ्ठल हा ᛁᛁ४ᛁᛁ
७) योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजणी
योगिया दुर्लभ तो म्या देखीला साजणी ᛁ
पाहतां पाहतां मना न पुरेचि धनी ᛁᛁ१ᛁᛁ
देखिला देखिला गे माये देवांचा देवो ᛁ
फिटला संदेहो निमालें दुजेपण ᛁᛁ२ᛁᛁ
अनंत रूपे अनंत वेषें देखिलें म्यां त्यासी ᛁ
बाप रखुमादेवीवरू खूण बाणली कैसी ᛁᛁ३ᛁᛁ
८) देवाचिये द्वारी उभा क्षणभरी
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी ᛁ तेणे मुक्ति चारी साधियेल्या ᛁᛁ
हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा ᛁ पुण्याची गणना कोण करी ᛁᛁ
असोनी संसारी जिव्हे वेगु करी ᛁ वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ᛁᛁ
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे ᛁ द्वारकेचा राणा पंडावाघरीं ᛁᛁ
९) कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता
कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता ᛁ बहीण बंधू चुलता कृष्ण माझा ᛁᛁ१ᛁᛁ
कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारू ᛁ उतरी पैल पारू भवनदी ᛁᛁ२ᛁᛁ
कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन ᛁ सोईरा सज्जन कृष्ण माझा ᛁᛁ३ᛁᛁ
तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा ᛁ वाटे न करता परता जीवा ᛁᛁ४ᛁᛁ
१०) ज्ञानियांचा राजा गुरु महाराव
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ᛁ म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसे ᛁᛁ१ᛁᛁ
मज पामरा हें काय थोरपण ᛁ पायींची वहाण पायी बरी ᛁᛁ२ᛁᛁ
ब्रह्मादिक जेथें तुम्हा वोळगणे ᛁ इतर तुळणे काय पुढे ᛁᛁ३ᛁᛁ
तुका म्हणे नेणों युक्तीचिया खोली ᛁ म्हणोनी ठेविली पायीं डोई ᛁᛁ४ᛁᛁ
११) पंढरीचा वास चंद्रभागे स्नान
पंढरीचा वास चंद्रभागे स्नान ᛁ आणिक दर्शन विठोबाचे ᛁᛁ१ᛁᛁ
हेंचि घडो मज जन्मजन्मांतरी ᛁ मागणे श्रीहरी नाही दुजे ᛁᛁ२ᛁᛁ
मुखी नाम सदा संतांचे दर्शन ᛁ जनीं जनार्दन ऐसा भाव ᛁᛁ३ᛁᛁ
नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी ᛁ कीर्तन गजरीं सप्रेमाचे ᛁᛁ४ᛁᛁ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा