पखावज निर्मीती ( इतिहास )
ॐ नमः शिवाय I ॐ नमः शिवाय I
पुरातन काळी भगवान श्री शंकरांनी एक मस्तवाल राक्षसाचा वध केला. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. स्वतः श्री भगवान शंकर सुद्धा आनंदित होऊन तांडव नृत्य करू लागले . पण ह्या त्यांच्या नृत्याने तिन्ही लोक हादरून गेले ,भयभीत झाले . त्यांनी जर का हे नृत्य थांबवले नाही तर प्रलय होईल अशी सर्वांना भीती वाटू लागली. पण तांडव नृत्य करणाऱ्या भगवान शंकरांना थांबविला कोण ? शेवटी सृष्टी निर्माता ब्रह्मदेव यांनी त्यातून मार्ग काढला . ब्रह्मदेवांनी , भगवान शंकरांनी मारलेल्या त्या भयंकर राक्षसाच्या कातड्यापासून एक ताल वाद्य तयार केले आणि ते वाद्य कलेची देवता असलेले महाकाय गणराज गणपतीला वाजविण्यास सांगितले . गणपतीने ते वाद्य कौशल्यपूर्ण वाजवून जटाधारी त्या महादेवाचे शंकरांचे नृत्य हळूहळू थांबवले, तेच वाद्य पुढे चालून मृदंग किंव्हा पखवाज म्हणून ओळखले जाऊ लागले . अशी एक अख्यायीका आहे . पखवाज हे फार जुने वाद्य आहे . ते देवांचे वाद्य म्हणून विष्णू वाद्य म्हणून ओळखलं जाते . पखवाज, पख म्हणजे बाहू आणि आवाज म्हणजे वाजविणे , हे बोल वाजविण्यास बाहूंचा उपयोग करावा लागतो तो हा " पखवाज ".
पखवाजाच्या काही व्याख्या खालीलप्रमाणे ( कुठलेली ठोस विधान करता येणार नाही ) :-
१) पख म्हणजे पर किंव्हा पाकळी , पंजाने वादन करतांना संपूर्ण हाताची हालचाल पक्षांच्या पंखांच्या हालचालीसारखी वाटते म्हणून त्यास पखवाज असे म्हणतात.
२) कमळावर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांचा आवाज ऐकून ह्या वाद्याची कल्पना साकारली गेली म्हणून त्यास पखवाज असे म्हणतात.
३) पख म्हणजे पंजा , पंजाने वाजविले जाणारे म्हणून पखवाज.
मृदंग महिमा
संगीताचा मूळ गाभा म्हणजेच स्वर ,नाद
पखवाजावरील 'धा' चा निनाद म्हणजेच ब्रह्मनाद होय .
कीर्तनी भजनी मृदंगाची गाथा I न्हावू घाली पंढरीनाथ सर्वकाळ II
अभंग जेव्हा होतो गोड I मृदंगाची त्याला असे जोड II
जया टाळ मृदंगाची साथ I नाचतो साक्षात पंढरीनाथ I
लावूनी मृदंग श्रुती टाळ घोष I सेवू ब्रह्मरस आवडीने I
....... संत शिरोमणी तुकाराम महाराज
मृदंग - मृदंग भारतीय चलशास्त्रानुसार पुराणांमध्ये उल्लेखलेले वाद्य मातीपासून तयार केलेले असून त्यांच्या दोन्ही बाजूंना चामडे मढविलेले असे. मातीपासून बनवलले म्हणून त्यास मृदंग ( मृदु + अंग ) असे म्हटले जाते .

संदर्भ- निनाद ( नीळकंठ नारायण राजे )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा